मला व माझ्या कुटुंबीयांना तुरुंगात टाकून आमदार होऊ पाहणाऱ्यांना जनतेनेच अद्दल घडवली : हसन मुश्रीफ

उत्तूर: मला व माझ्या कुटुंबीयांना तुरुंगात टाकून आमदार होऊ पाहणाऱ्यांना जनतेनेच अद्दल घडवली. त्यांनी ज्या पक्षात राहून ही कृती केली आता मी त्या पक्षासोबत असून मी ज्या पक्षात होतो त्या पक्षात जायची वेळ त्यांच्यावर आली. त्यामुळे वाईट कृत्ये करणाऱ्याला माफी मिळत नाही.उत्तूर (ता. आजरा) येथे वैद्यकीय शिक्षण कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्याबद्दल आयोजित सत्कार समारंभप्रसंगी हसन मुश्रीफ बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य वसंतराव धुरे होते.

 

मुश्रीफ म्हणाले, सलग पाचवेळा मी आमदार झाल्यावर मोठे चक्रव्यूह करून मला अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला. लोकांनाही नवा चेहरा, बदल हवा असतो. मात्र; गोरगरिबांची केलेले कामे, कल्याणकारी योजना व रुग्णसेवेमुळे मी आमदारपदाचा षटकार ठोकला. आता राज्य शासनाच्या वचननाम्यातील सर्व योजना नक्की पूर्णत्वाला नेणार आहे.

यावेळी नागरिकांच्या वतीने मंत्री मुश्रीफ यांचा सत्कार झाला. अमोल सावंत, अनिकेत जांभळे, नीरज दोरूगडे या सैन्यातील जवानांचा सत्कार केला.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उमेश आपटे, केडीसी बँकेचे संचालक सुधीर देसाई, सरपंच किराण आमणगी, मारुतराव घोरपडे, दिपकराव देसाई, अशोक अण्णा चराटी, रेहमान नाईकवाडे, शिवलिंग सन्ने, संभाजी तांबेकर, बहिरेवाडीच्या सरपंच रत्नजा सावंत, उपसरपंच समीक्षा देसाई आदी उपस्थित होते.

यावेळी वसंतराव धुरे, महादेवराव पाटील यांची भाषणे झाली.

माजी उपसभापती शिरीष देसाई यांनी स्वागत केले. सुधीर सावंत यांनी आभार मानले. सौरभ वांजळे यांनी सूत्रसंचालन केले.

उत्तुरला मिनी एमआयडीसी उभारू…….
हसन मुश्रीफ यांनी उत्तूरला एक हजार एकर जमीन उपलब्ध झाली तर मी मिनी एमआयडीसी उभा करून दाखवतो, अशी घोषणाही केली.