इचलकरंजी येथे राज्यस्तरीय धनगर वधु वर मेळावा

कुंभोज  (विनोद शिंगे)
इचलकरंजी धनगर समाजोन्नती मंडळ यांच्या वतीने राज्यस्तरीय धनगर वधु वर मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यास  आवाडे इचलकरंजी जनता सह बँकेचे चेअरमन स्वप्निलआवाडे यांनी उपस्थित राहून राज्यातील विविध ठिकाणाहून आलेल्या धनगर  बांधवांना शुभेच्छा दिल्या. तसेच धनगर समाज संघर्ष समितीच्या जिल्हा अध्यक्षपदी राजू पुजारी यांची निवड झालेबद्दल स्वप्निलआवाडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी समाजाचे जिल्हाध्यक्ष राजू पुजारी शहर अध्यक्ष शंकर पुजारी, अरविंद पुजारी, आयको स्पिनिंग मिलचे संचालक विठ्ठल सुर्वे, दत्तात्रय कुंभोजे, अनिल पुजारी, सचिन हेरवाडे, शिवाजी शिंदे, योगिता घुले, हरीश सुर्वे, विद्या लवटे, राजश्री शिंदे, सुषमा पुजारी यांच्यासह इतर मान्यवर व समाजातील महिला भगिनी व बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.