हिरकणी बुरुजाचे जतन आणि संवर्धन कार्य सुरू!

पुणे : रायगड विकास प्राधिकरणाच्या वतीने आणि भारतीय पुरातत्व खात्याच्या मान्यतेने हिरकणी बुरुजाचे जतन आणि संवर्धन करण्याचे महत्त्वाचे कार्य सुरू झाले आहे. मराठा साम्राज्याच्या लष्करी वास्तुशास्त्राचा सर्वोत्तम नमुना असलेल्या या बुरुजाचे तीन टप्प्यांत संवर्धन होणार आहे.

 

संवर्धनाचे मुख्य टप्पे:
झाडे-झुडपांचे उच्चाटन:
हिरकणी बुरुजावर उगवलेल्या झाडा-झुडपांचे समूळ उच्चाटन केले जाईल आणि त्यासाठी रासायनिक फवारणी केली जाईल.

माती व मलबा हटवणे:
बुरुजाच्या आत साचलेल्या मलब्याचा थर काढून मूळ कातळ आणि फ्लोरिंगचे अवशेष उघड केले जातील. पारंपरिक बांधकाम साहित्याचा उपयोग करून जलरोधक उपाययोजना करण्यात येतील.

भिंतींचे संवर्धन:
बुरुजाच्या भिंतींचे पारंपरिक पद्धतीने जलरोधक काम केले जाईल. पावसाचे पाणी निचरणाऱ्या मूळ जलनाळ्या पुन्हा कार्यान्वित केल्या जातील.

हिरकणी बुरुजाचा परिसर दुर्गम व अवघड आहे. संवर्धन व जतनाचे काम चालू असल्याने शिवभक्तांनी या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करू नये. शिवभक्तांच्या सुरक्षिततेसाठी लवकरच योग्य उपाययोजना करण्यात येतील.

🤙 9921334545