ऐतवडे बुद्रुक येथे बिबट्याच्या हल्ल्यात ११ शेळ्या ठार

वाळवा: वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक येथील माजी उपसरपंच सौरभ पाटील यांच्या शेतात बिबट्याने केलेल्या हल्ल्यातशंकर गणपती वाघमोडे या शेतकऱ्याच्या ११ शेळ्या ठार झाल्या. मंगळवारी सायंकाळी ही घटना घडल्याचे समजल्यावर तात्काळ घटनास्थळी आमदार सदाभाऊ खोत यांनी भेट दिली, तसेच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील याची गंभीर दखल घेऊन तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.

 

सौरभ पाटील यांच्या शेतात शेळ्या बसण्यासाठी जागा आहे. दिवसभर शेळ्या चरून सायंकाळी पाटील यांच्या शेतात आल्या होत्या. त्यावेळी बिबट्याने केलेल्या हल्यामध्ये ११ शेळ्या ठार झाल्याने मेंढपाळांवर मोठा डोंगर कोसळला आहे.

🤙 9921334545