मंत्री हसन मुश्रीफांची कागल येथील नाताळ निमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थिती

कोल्हापूर : सेंट अँन्ड्रयूज चर्च, सोमवार पेठ, कागल यांच्या वतीने ख्रिस्ती बांधवांनी आयोजित केलेल्या ख्रिसमस (नाताळ) निमित्त कार्यक्रमास मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

 

प्रभू येशूने दिलेला दया, क्षमा, शांती हा संदेश नेहमीच आपल्याला प्रेरणा देत असतो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ख्रिस्ती बांधवांच्या ज्या अपेक्षा व मागण्या असतील त्या पूर्ण करून देण्याचे आश्वासनही मंत्री मुश्रीफ यांनी दिले.

यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्यासाहेब माने, माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, नवल बोते, माजी नगरसेवक सौरभ पाटील, सुरेश घोरपडे, शमवेल तिवडे, जोश जॉन, रोहित जॉन, संजय सोनुले, प्रकाश सोनुले, अमर दावणे, विजय सोनुले, शाहूल सोनुले, सुरेश दाभाडे, बबलू दाभाडे, यांच्यासह ख्रिस्ती बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.