कोल्हापूर : राजेंद्रनगर प्रभाग क्र. ६५ मधील श्रीराम किराणा स्टोअर्स ते श्रीकांत पाटील यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी खासदार धनंजय महाडिक यांच्या माध्यमातून आणि युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्या विशेष प्रयत्नातून २५ कोटींच्या विकास निधीतून २० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.
या महत्त्वपूर्ण प्रकल्पाच्या शुभारंभाच्या वेळी संग्राम निकम, माजी नगरसेविका रूपाराणी निकमजी, नामदेव नागटिळेजी, सुखदेव बुध्याळकरजी, शिवनाथ सगटजी, दत्ता लोखंडेजी, महादेव बिरजेजी, प्रसाद पाटोळेजी, बंकट सूर्यवंशीजी, राम नागटिळेजी, दीपक नागटिळेजी, राहुल सोनटक्केजी, भिकाजी सोनटक्केजी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
हा प्रकल्प परिसरातील नागरिकांना चांगल्या आणि सुरक्षित रस्त्याचा लाभ देऊन त्यांच्या दैनंदिन जीवनात सुधारणा घडवेल. यासाठी सर्व स्तरांवरून केलेल्या सहकार्याबद्दल नागरिकांनी माननीय खासदारजी आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे आभार मानले आहेत.