महाराष्ट्र प्रदेश कमिटी अनुसूचित विभाग यांच्यावतीने केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या राजनाम्याची मागणी

कुंभोज  (विनोद शिंगे)
कोल्हापूर जिल्हा प्रशासनाला निवेदन देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा एकेरी उल्लेख करून अवमानकारक वक्तव्य केल्याचा जाहीर निषेध व त्याने तात्काळ राजीनामा द्यावा या विषयाचे मागणी जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्याकडे महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग यांच्या वतीने प्रदेश सचिव माननीय विजयकुमार भोसले यांचे नेतृत्वाखाली शिस्टमंडळाने केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तमाम दिनदलीतांचे मार्गदाते मुक्तिदाते आहेत. भारत देशाची अस्मिता आहेत तसेच भारतीय संविधानाचे निर्माते असून भारत देशाला संविधान देऊन त्यांनी फार मोठे राष्ट्र निर्मितीचे क्रांतिकारी कार्य केल आहे.

या महान व्यक्तीचे उपकार भारत देशावर आहेत अशा व्यक्तीचे नाव हजार वेळा जरी घेतले तरी कमी आहे.  पण देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नावाचा एकेरी उल्लेख करत आंबेडकर हे नाव फॅशन झाल्याचे म्हणत महापुरुषांचा अवमान केलेला आहे. तरी अमित शहाला देशाच्या गृहमंत्री पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही, त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी आज निवेदनाद्वारे करण्यात आली.

कोल्हापूर जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे उपाध्यक्ष सुकुमार कोठावळे, रिटायर्ड ओसर्स राज्य उपाध्यक्ष डॉ.अनिल माने,महावीर लाटकर, हिंदुराव कांबळे, दिगंबर कांबळे, विक्रम कांबळे,डी.के.कांबळे संजय कांबळे,बबन कांबळे, प्रमोद हुपरीकर, महेंद्र पांडव, बाळासाहेब कांबळे, मिलिंद कुरणे, महेश टोणपे, विजय बनगे,सतिश भोसले आदिसह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

🤙 9921334545