पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सवास आ.अशोक माने यांची भेट

कुंभोज (विनोद शिंगे)
पट्टणकोडोली ता हातकणंगले येथे श्री मद्देवाधिदेव 1008 अतिप्राचीन,अतिशययुक्त भ.आदिनाथ दिगंबर जिनमंदिर अतिशय क्षेत्र पट्टणकोडोली येथे द्वादश वर्षपूर्ती निमित्त पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

 

हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलितमित्र डॉ अशोकराव माने यांनी उपस्थित राहून महाराजांचे दर्शन घेतले.

यावेळी अभयकुमार मगदूम,संजय खटकुळे, माजी जि प सदस्य शिरीष देसाई,भाजपा शहराध्यक्ष राणोजी पुजारी, गो गा बाणदार,संदीप शिरगुप्पे,कौस्तुभ पाटील,किरण भोजकर,अक्षय कुसान,अनिल कांबळे,प्रवीण भायंदर यांसह श्रावक-श्राविका मोठया संख्येने उपस्थित होते.