संस्था चांगले संस्कार आणि उच्च विचाराने प्रगतशील होत असते : चेतन नरके

कोल्हापूर : आप्पासाहेब नाईक (दादा) श्री पैसाफंड शेतकरी सहकारी बँक लि. हुपरी यांच्या वतीने सामाजिक, सहकार, अध्यात्मिक कार्यातील थोर लोकसेवक, संस्थापक कार्य. संचालक कै. आप्पासाहेब बळवंत नाईक (दादा) आणि थोर स्वातंत्र्य सेनानी, सहकारातील दिव्य व्यक्तिमत्व स्व. एल. वाय. पाटील (बाबा) यांचा संयुक्त पुण्यस्मरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. चेतन नरके उपस्थित होते.

 

या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त शेतकरी मेळावा आणि पीक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच सहकार-समाजसेवा, उद्योग, शिक्षण, शेती इ. क्षेत्रातील गुणवंत व्यक्ती व संस्थांना गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले.

यावेळी चेतन नरके म्हणाले.,कोणतीही संस्था चांगले संस्कार आणि उच्च विचाराने प्रगतशील होत असते. याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे पैसाफंड बँक लि. हुपरी. स्व. आप्पासाहेब नाईक व स्व. एल. वाय. पाटील (आबा) यांनी स्वातंत्र्योत्तर काळापासून रुजवलेले संस्कार आणि त्यांच्या विचारांवर वाटचाल करत बँकेने केलेली प्रगती हीच या दोन व्यक्तींना खरी आदरांजली आहे. संस्थेमार्फत आयोजित या कार्यक्रमांचे खरोखर कौतुक आहे.

यावेळी माजी मंत्री प्रकाशराव आवाडे, बँकेचे अध्यक्ष आण्‍णासो भोजे, बँकेचे संचालक शिवराज सदाशिव नाईक, श्रीकांत नाईक, शामराव गायकवाड, माजी नगराध्यक्ष जयसिंगपूर. डॉ. विना माने, विलास नाईक, प्रकाश जाधव, बँकेचे सर्व संचालक मंडळ, जनसंपर्क कमिटी सदस्य, सभासद व सेवक आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.

🤙 9921334545