आंबेडकरांच्या बद्दल अमित शहा यांच्या वक्तव्याच्या निषेधासाठी विधिमंडळाबाहेर महाविकास आघाडीचे आंदोलन

नागपूर: केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याचा आरोप करत इंडिया आघाडी आक्रमक झाली आहे .राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये काँग्रेस महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

 

 

 

बाबासाहेब आंबेडकर यांनी माणसाला माणूस बनण्याचे काम केले आहे. या महामानवाविषयीच्या या वक्तव्याने भाजपचा खरा चेहरा समोर आल्याची भूमिका विजय वड्डेटीवार यांनी व्यक्त केली.

एकच साहेब बाबासाहेब, बाबासाहेब आंबेडकर असा सतत जयघोष करत विधानपरिषद दणाणून सोडला.
यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार अभिजीत वंजारी, भाऊ जगताप ,सचिन अहिर ,नितीन राऊत ,शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे , वरूण सर्देसाई ,रोहित पवार, भास्कर जाधव, अभिजीत वंजारी, भाई जगताप ,विकास ठाकरे, ज्योतिका गायकवाड रोहित पाटील, प्रकाश गजभिये, काँग्रेस शिवसेना व राष्ट्रवादीचे आमदार निळ्या टोप्या व दुपट्टे परिधान करून आंदोलनात सहभागी झाले होते.