कृष्णराज महाडिक यांनी निगवे ,मोरेवाडी येथे दिली भेट

कोल्हापूर : युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्या गंगावेश दत्त मंदिर येथील समाधी स्थळाला भेट दिली. यावेळी कृष्णराज महाडिक म्हणाले कि, हे पवित्र स्थान त्यांच्या आध्यात्मिक कार्याची आणि सेवाभावी जीवनाची साक्ष देते. येथे आल्यावर शांतता आणि भक्तीचा अद्भुत अनुभव मिळाला. श्रद्धा आणि प्रेरणेने भारावलेल्या या ठिकाणी भेट देणे अत्यंत सौभाग्याचा क्षण ठरला. 

 

 

 

निगवे खालसा येथे पार पडलेल्या खासदार चषक स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक प्रमुख उपस्थित होते. या स्पर्धेचा अंतिम सामना ईगल स्पोर्ट्स, नांदगांव व बॉस स्पोर्ट्स, निगवे यांच्यात पार पडला. यावेळी कृष्णराज महाडिक यांनी विजेत्या संघाचा सत्कार करत उपस्थित सर्वांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी प्रताप पाटील , सुमित चौगले , संभाजी किल्लेदार , राजवर्धन पाटील , विशाल पाटील , संतोष कांजर , अभिषेक पाटील , सौरभ किल्लेदार , धीरज जाधव , यांच्यासह गावातील सर्व महाडिक प्रेमी कार्यकर्ते व क्रिकेट चाहते उपस्थित होते.

मोरेवाडी येथील केदार नगरमध्ये साई मंदिराच्या स्लॅबचा शुभारंभ यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक साहेब यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कृष्णराज महाडिक यांनी उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधला.

यावेळी माजी सरपंच संजय दादा वास्कर , माजी जिल्हा परिषद सदस्य मनीषा ताई वास्कर , सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल गोते , अनिल मोरे , अण्णा मोरे , ग्रामपंचायत सदस्य सायली गाठे , ग्रामपंचायत सदस्य उज्ज्वला मोरे , अमोल मोरे , ओंकार मोरे , ग्रामपंचायत सदस्य संभाजी मोरे जी, सामाजिक कार्यकर्ते अमोल भीलुगडे , रणजित भीलुगडे , पृथ्वीराज जाधव ,अजय पारगावकर , संदीप कुईगडे  त्याचबरोबर महिला, मुले अणि युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

🤙 9921334545