कुंभोज (विनोद शिंगे)
श्री बाहुबली ब्रह्मचर्याश्रम व श्री बाहुबली विद्यापीठ, बाहुबली येथे दि. १९ डिसेंबर रोजी प. पू. गुरुदेव १०८ श्री समंतभद्र महाराज यांची १३३ वी जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न होणार आहे.यामध्ये स. ७:३० वा.गुरुदेवांच्या प्रतिमेची मिरवणूक, यानंतर बाहुबली ब्रह्ममूर्तीचा चरणाभिषेक संपन्न होणार आहे.
त्यानंतर गुरुदेवांच्या समाधीस्थळी पूजन व इष्टोपदेश पठण संपन्न होणार आहे, त्यानंतर स.९:३० वा. विनयांजली सभा आयोजित केलेली आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्ष डी.सी.पाटील,महामंत्री श्री बाहुबली ब्रह्मचर्याश्रम व विद्यापीठ हे असणार आहेत. तर प्रमुख अतिथी म्हणून अजित महावीर शेटे, अध्यक्ष, विशाल उद्योग समूह,कसबा सांगाव तसेच प्रमुख वक्ता म्हणून विठ्ठल कोतेकर, माईंड ट्रेनर,कोल्हापूर हे उपस्थित असणार आहेत.
या कार्यक्रमासाठी प्रकाशराव आवाडे,अध्यक्ष, बाहुबली विद्यापीठ, सनतकुमार आरवाडे,अध्यक्ष बाहुबली ब्रह्मचर्याश्रम, धनराजजी बाकलीवाल, उपाध्यक्ष, बाहुबली ब्रह्मचर्याश्रम,अरविंदजी दोशी, विश्वस्त-अध्यक्ष बाहुबली आश्रम व विद्यापीठ, डॉ.बाळासाहेब चोपडे,कोषाध्यक्ष बाहुबली ब्रह्मचर्याश्रम, श्रीधर हेरवाडे जॉइंट सेक्रेटरी, बाहुबली विद्यापीठ,बाबासाहेब पाटील कोषाध्यक्ष बाहुबली विद्यापीठ यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होणार आहे.
या सर्व कार्यक्रमाचा लाभ परिसरातील सर्व जैन श्रावक- श्राविकांनी घ्यावा असे आवाहन बाहुबली विद्यापीठाचे संचालक गोमटेश बेडगे यांनी केले आहे.