मुंबई: बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचा निषेध करत विरोधकांनी सभात्याग केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीतील नक्षलवादाचे आव्हान स्वीकारत तेथील पालकमंत्री पद स्वीकारले होते. तसेच आता बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी त्यांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री स्वीकारावे अशी मागणी आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली. जर या अधिवेशनात कारवाई नाही झाली, तर जिल्ह्यात आंदोलन होईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
चांगले काम करणाऱ्या सरपंचाचे डोळे जाळण्यात आले. आठ दिवस उलटूनही मुख्य आरोपीला अटक झाली नसल्याचा मुद्दा नमिता मुंदडा यांनी मांडला. तसेच आरोपीला फासावर लटकवण्याची मागणी केली. बीड आणि परभणीतील घटनेचा निषेध म्हणून सभात्याग करत असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले आणि विरोधकांनी सभात्याग केला