कोल्हापूर : भागीरथी महिला संस्था, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाउन आणि इन्स्पायर अकॅडमी, कोल्हापूर यांच्यावतीने व भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुधंती महाडिक यांच्या संकल्पनेतून आयोजित टॅलेंट सर्च परीक्षेत यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ टाकाळा येथील विटी पाटील सांस्कृतिक भवन येथे संपन्न झाला. याप्रसंगी खासदार धनंजय महाडिक आणि यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक उपस्थित होते.
या टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये १६०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. त्यापैकी २०० विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले. यश प्राप्त केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांना धनंजय महाडिक यांनी पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
शैक्षणिक वर्षात परीक्षेसाठी प्रचंड मेहनत घेऊन अभ्यास करणे गरजेचे आहे. यशस्वी होण्यासाठी कोणताही शॉर्टकट घेता येत नाही. त्यासाठी कठोर परिश्रम गरजेचे ठरते. तरच आपल्याला निश्चित ध्येय गाठता येते. म्हणून विद्यार्थ्यांनी उत्तम अभ्यास करून दर्जेदार यश संपादन करावे. सौ. अरूंधती महाडिक यांनी परिश्रम घेवून, विद्यार्थ्यांना टॅलेंट सर्च या परीक्षेचा प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्याचा भविष्यकाळात निश्चितच उपयोग होईल.
यावेळी उद्योजक सचिन मेनन, एनएसईचे मार्गदर्शक हर्ष अग्रवाल, बी. एम. हिर्डेकर, वैशाली भोसले, हर्ष अग्रवाल, बी. एस. शिंपुकडे, रमेश खटावकर, प्रशांत शर्मा, वर्षा संकपाळ, बी. एस. शिंपुकडे, भारती नायक, करूणाकर नायक व इतर मान्यवर, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.