नागपूर : नागपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित भव्य सत्कार सोहळा आणि पदाधिकारी मेळाव्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित राहून सर्वांना संबोधित केले. मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर लवकरच सुनील तटकरे, चंद्रशेखर बावनकुळे आणि एकनाथ शिंदे यांचा एक एक व्यक्ती एकत्र बसणार आहेत. दोन महिन्यातच महामंडळावर नियुक्ती केल्या जातील. मंत्रिमंडळात सर्वच इच्छुकांना संधी देणे अवघड होते. मागच्या सरकारमध्ये काही जणांना दीड वर्षाची संधी मिळाली, आता आम्ही निर्णय घेतला आहे मंत्र्यांना अडीच अडीच वर्षासाठी काम करण्याची संधी दिली जाईल.
महाराष्ट्रातील जनतेने आपल्यावर मोठ्या विश्वास ठेवून विधानसभा निवडणुकीत निवडून दिले आहे त्या विश्वासाच्या आधारे आपली जबाबदारी आणखी वाढली आहे आगामी काळात पक्षाच्या वृद्धीसाठी नागपूर मध्ये विदर्भ विभागीय कार्यालयाचे उद्घाटन झाले आहे त्यामुळे पुन्हा जोमाने काम सुरू ठेवण्याची आवश्यकता आहे.