कोल्हापूर : आज दत्त जयंती संपूर्ण महाराष्ट्रात साजरी केली जात आहे .कोल्हापूरच्या नरसिंहवाडीत देखील दत्त जयंतीचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. दत्त मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची मोठी रांग पाहायला मिळत आहे.
नृसिंहवाडीतील दत्त महाराजांचे दर्शन घेण्यासाठी लाखो भावीक नृसिंहवाडी मध्ये दाखल झाले आहेत.दत्त जयंती निमित्त मंदिराला आकर्षक रोषणाई आणि फुलांनी सजावट करण्यात आली आहे . पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग लागलेली आहे .पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कृष्णा व पंचगंगा संगमावर असणारे या मंदिरात दत्त दर्शनासाठी मोठी गर्दी झाली आहे.
पोर्णिमा तिथी ही संध्याकाळी पाच वाजता सुरू होणार असून दुसऱ्या दिवशी पंधरा डिसेंबर रोजी दुपारी अडीच वाजेपर्यंत असणार आहे.दत्त जयंती ही पौर्णिमा दिवशी आणि संध्याकाळी साजरी करण्यात येते. म्हणून 14 डिसेंबरला दत्त जयंती राज्यात साजरी होत असताना पाहायला मिळत आहे.