मुंबई: शरद पवार यांचा 85 वा वाढदिवस १२ डिसेंबर रोजी साजरा करण्यात आला. यानिमित्ताने अजित पवार , सुनेत्रा पवार, पार्थ व जय पवार, रोहित पवार हे भेटण्यासाठी व शुभेच्छा देण्यासाठी शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी गेले होते. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार म्हणाल्या की ,या भेटीमागे काही राजकारण असेल ,असे मला वाटत नाही. तसेच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित यावेत.अशी इच्छा सुनंदा पवार यांनी व्यक्त केली.
भीमथडी जत्रा या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी त्या कृषी महाविद्यालयात शुक्रवारी (१३)सकाळी आल्या होत्या त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
विखुरलेले राहण्यापेक्षा एकमुठीने पक्ष राहिला तर महाराष्ट्रात त्याची ताकद चांगली राहील. माझा राजकारणाशी काही संबंध नाही. सामाजिक क्षेत्रात मी गेली 35 वर्षे काम करते. प्रचार सोडला तर मी राजकारणात सक्रिय नसते किंवा राजकीय व्यासपीठावर मी कधी जात नाही. त्यामुळे त्या दोघांनी काय निर्णय घ्यायचा आहे त्यांनी ठरवावे असेही त्या म्हणाल्या.