कोल्हापूर : वारणा सहकारी संकुलाचे निर्माते,वारणा खोऱ्याचे भाग्यविधाते,वारणा सहकारी संकुलाच्या स्थापनेद्वारे ७० खेड्यातील कोरडवाहू जमिनीला सुजलाम सुफलाम करणारे नेते.सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक आमदार विनयराव कोरे (सावकार) यांच्यासमवेत आमदार अशोकराव माने यांनी वारणानगर येथील स्मृतिस्थळावर पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
यावेळी जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम ,युवा नेते विश्वेश कोरे, केडीसीसी बँकेचे संचालक विजयसिंह माने वारणा दूध संचालक राजवर्धन मोहिते ,सुभाष जाधव ,सुहास राजमाने,यांच्यासह विविध संस्थांचे चेअरमन,संचालक,कर्मचारी तसेच वारणा खोऱ्यातील विविध गावांचे नेते,कार्यकर्ते,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.