मुंबई: भाजप-बांगलादेशात हिंदूवर अत्याचार सुरू असून देखील त्यावर काहीच भाष्य करत नाही. भाजपच हिंदुत्व फक्त मतापुरता मर्यादित आहे का ? भाजपच हिंदुत्व आता काय करत आहे ?असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केला.
बांगलादेशातील हिंदू वरील अत्याचारावर चर्चेसाठी आमच्या खासदारांची वेळ पंतप्रधान मोदी यांनी नाकारली .बांगलादेश बाबत पंतप्रधान मोदींची काय भूमिका असणार आहे हे त्यांनी स्पष्ट कराव अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. इथे केवळ बटेंगे तो कटेंगे अस म्हणून काही उपयोग नाही. बांगलादेशात हिंदूंची हत्या होते, आता तुम्ही काय करणार ?असा अहवाल ही त्यांनी यावेळी केला.
संसदेत महत्त्वाच्या विषयावर चर्चा होत नाही, नको त्या विषयावर चर्चा होत आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूक निकालाबाबत ते म्हणाले, लोकांच्या मनात निकालाबाबत अजूनही धक्का आहे. बहुमत मिळाले तरी अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार नाही असेही ते यावेळी म्हणाले.