परभणी येथील समाजकंटकांच्यावर कारवाई करा- प्रमोद कदम

कुंभोज ( विनोद शिंगे)

परभणी येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळा व संविधान मोडतोड करणारे समाज कंटकाचा जाहीर निषेध करत आहोत. त्याचेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन कायदेशीर कडक करवाई करणेबाबत वंचित बहुजन आघाडी कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष प्रमोद कदम यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पोलीस प्रमुख व जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

 

 

परभणी येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळा व संविधान मोडतोड करणारे समाज कंटकाचा जाहीर निषेध करुन , त्याचेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन कायदेशीर कडक करवाई करण्यात यावी. अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद कदम यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस प्रमुख व जिल्हाधिकारी यांच्याकडे केली.

सदर झालेल्या प्रकार दुदैवी संतापजनक असून अशा घटनेच्या पाठीमागे कोणती शक्ती ताकद व सहकार्य करते हे शासनाने शोधून काढून त्याच्यावर सुध्दा देश द्रोहाचा गुन्हा दाखल करुन कडक कायदेशीर कारवाई करावी अशी आग्रहाची मागणी लोकशाही पध्दतीने शांततेच्या मार्गाने करीत आहोत तसेच अशा प्रकारच्या खास करुन भारत देशाचे संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबत असे प्रकार घडत आहेत आणि अशा घटना घडविणे बाबत काही राजकीय पक्षाचे काही नेत्यांनी संविधान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत वादग्रस्त विधाने केली त्यामुळेच अशा घटना घडत आहेत असे म्हटले तर चुकीचे होणार नाही. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी अशा वादग्रस्त राजकीय नेत्यांना आपल्या पक्षातून निलंबित करावे व त्याचेवर सुध्दा कायदेशीर कारवाई करावी.