आचार्य अनेकांत सागरजी महाराज यांनी कर्मवीर अध्यासन केंद्रास सदिच्छा भेट

कुंभोज (विनोद शिंगे)

प्रथमाचार्य १०८ प.पू.शांतीसागर महाराजांचे ७ वे पट्टाधिश आचार्य अनेकांत सागरजी महाराज यांनी कर्मवीर अध्यासन केंद्रास सदिच्छा भेट दिली.विशेष म्हणजे पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील व थोर जैन आचार्य प.पू.शांतीसागर महाराज यांची १९५४ साली नीरा येथे पंचकल्याणिक महोत्सवात प्रथम भेट झाली होती.

 

 

 

श्रावकांपासून काहीसे दूर बसलेल्या भाऊरावांना महाराजांनी जवळ बोलावून आस्थेने चौकशी केली होती. रयत शिक्षण संस्थेची सविस्तर माहिती घेतली होती.कर्मवीरांच्या आभाळाएवढ्या शैक्षणिक व सामाजिक कार्यावर प्रसन्न होऊन उद्गार काढले होते. आम्ही करीत असलेला उपदेश जैन समाज व इतर समाजही ग्रहण करतो. परंतू इथे बसलेल्या मंडळीपेक्षा आपले कार्य फार भरीव, वेगळे आणि टिकाऊ कार्य आपल्या हातून चालले आहे.

पृथ्वीवर सर्वत्र दुष्काळ पडला होता तेव्हा जैन समाजाचे आद्य भगवान ऋषभ देवांनी भयभीत समुदायाला सहा कलमी कार्यक्रम दिला होता.असि,मसि,कृषी, विद्या,वाणिज्य आणि शिल्प इत्यादी.तदनुसार विद्या क्षेत्रातील आपले कार्य अवर्णनीय असेच आहे.