छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखानाच्या वतीने आ. अमल महाडिकांचा सत्कार

कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून विजयी झाल्यानंतर अमल महाडिक यांचा छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना परिवाराच्यावतीने सत्कार करण्यात आला. केलेल्या सत्काराचा कृतज्ञपणे स्वीकार आ. अमल महाडिक यांनी केला.

 

 

=आपल्या लोकांनी केलेला हा सत्कार जबाबदारीची जाणीव ठळक करणारा आहे.छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचा अध्यक्ष आणि कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा आमदार अशा दोन्ही जबाबदाऱ्या पेलण्यासाठी स्फूर्ती देणारा आहे. अशा भावना आ. अमल महाडिक यांनी व्यक्त केल्या.