कोल्हापूर : इचलकरंजी महानगरपालिका शिक्षण विभाग, मॉडर्न हायस्कूल, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी, सेंट्रल रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी, आणि एक्झिक्युटिव्ह रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी टेक्सटाइल सिटी यांचे संयुक्त विद्यमाने इचलकरंजी येथील सुभाष खोत विज्ञान नगरीत आयोजित केलेल्या ५२व्या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी राहुल आवाडे यांनी प्रदर्शनाचा संपूर्ण आढावा घेत, विद्यार्थ्यांना प्रेरणादायक मार्गदर्शन केले आणि त्यांना आगामी यशासाठी शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमात प्रमुख पदाधिकारी, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.