कोल्हापूर:राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली करवीर विधानसभा मतदारसंघातील सडोली तसेच आजूबाजूच्या इतर गावातील कार्यकर्ता मेळावा तसेच महिला मेळावा संपन्न झाला.
या मेळाव्यास महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला आणि आपली मते मांडली. विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान या सर्वांनी गावोगावी जाऊन भेटी घेऊन महिलांनी मतदानाचा हक्क बजावा. तात्पुरत्या योजना तसेच भूलथापांना बळी पडू नका. अश्या पद्धतीने प्रचार करत मोठी कामगिरी पार पाडली. सौ. तेजस्विनी पाटील यांच्या सोबत पूर्ण वेळ कार्यरत राहून चांगल काम केलं. त्याबद्दल राहुल पाटील यांनी सर्वांचे यावेळी आभार मानले.