दिल्ली: ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकाला गुरुवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. यासंदर्भात जेपीसी स्थापन करून सर्व पक्षांच्या सूचना घेतल्या जाणार आहेत. त्यानंतर हे विधेयक संसदेत सादर करून पास केले जाईल. सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे.
वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या वेळी निवडणुका होत असतात मात्र या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाल्यानंतर देशात एकाच वेळी निवडणुका करवण्याची तयारी आहे.
यासाठी किमान 50 टक्के राज्यांचा पाठिंबा आवश्यक असणार आहे