परभणी घटनेची एसआयटी चौकशी करा – आप

कोल्हापूर (सोमनाथ जांभळे)

परभणी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याशेजारील प्रतीकात्मक संविधानाच्या प्रतिमेची तोडफोड केलेल्या घटनेची एसआयटी मार्फत सखोल चौकशी करण्यात यावी, तसेच संविधान प्रतिमेची तोडफोड करणाऱ्या समाजकंटकांना देशद्रोहाच्या गुन्हे अंतर्गत अटक करण्यात यावी अशी मागणी आम आदमी पार्टीने केली. या मागणीचे निवेदन तहसीलदार स्वप्नील पवार यांना देण्यात आले.

 

 

निवेदनात म्हटले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याशेजारील प्रतीकात्मक संविधानाच्या प्रतिमेची तोडफोड केलेली घटना अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. भारतीय संविधानाची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांना त्वरित अटक करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. तसेच या घटनेची एसआयटी स्थापन करून सखोल चौकशी करण्यात यावी. लोकजीवन विस्कळीत करणाऱ्या घटनांना आवर घालण्यासाठी भारतीय संविधानाची उपयोगिता व महत्त्व या विषयावरचे कार्यक्रम समाजातील सर्व स्तरांमध्ये तसेच शाळा, कॉलेज मध्ये सरकार व प्रशासनामार्फत घेण्यात यावे जेणेकरून समाजकंटक निर्माण होणार नाहीत अशीही मागणी आप पदाधिकाऱ्यांनी केली.

यावेळी शहर सचिव समीर लतीफ, दुष्यंत माने, विजय हेगडे, रमेश कोळी, विवेक भालेराव, संजय नलवडे, अजित पवार आदी उपस्थित होते.

🤙 9921334545