अजित पवारांचा जयंत पाटलांना ‘करेक्ट कार्यक्रम’वरून टोला

मुंबई: विधिमंडळाचे अधिवेशन सध्या सुरू आहे. यावेळी भाजप नेते आमदार राहुल नार्वेकर यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे . त्यांच्या अभिनंदनपर भाषण करताना अजित पवारांनी जयंत पाटलांना टोला लगावला.

 

 

अजित पवार म्हणाले, सदस्यांनी स्थान ग्रहण करण्यापूर्वी शपथ घेणे क्रमप्राप्त आहे. मग विरोधकांची भूमिका नियमबाह्य नाही का? काहीतरी स्टंटबाजी करायची, कधीतरी लक्षात घ्या की आपला करेक्ट कार्यक्रम झाला आहे.

लोकसभेत आमच्या जागा कमी आल्या म्हणून आम्ही रडलो नाही, 31 जागा आल्या तेव्हा ईव्हीएम गार गार वाटत होतं. आता गार वाटते की गरम हे तुमचं तुम्ही बघा असं म्हणत ईव्हीएम घोटाळा आरोप करणाऱ्या विरोधकावर अजित दादांनी निशाणा साधला आहे.

🤙 9921334545