कुंभोज ( विनोद शिंगे )
कुंभोज येथील कुंभोज गावचे सुपुत्र व जवाहर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले यांची जवाहर कारखान्याच्या संचालक व सलग तिसऱ्यांदा व्हाईस चेअरमन पदि निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार ग्रामपंचायत कुंभोज व महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आला.
यावेळी ग्रामपंचायतच्या सरपंच सौ स्मिता चौगुले, उपसरपंच अशोक आरगे गटनेते किरण माळी, प्रकाश पाटील ,माधुरी घोदे ,आप्पासाहेब पाटील, जयश्री जाधव, शुभांगी माळी,भरत भोकरे, सदाशिव महापुरे,दाविद घाटगे, प्रभाकर गोदे, उपस्थित होते.