मुंबई : भाजपचे आमदार राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी रविवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी त्यांचा एकमेव अर्ज आला होता. विरोधी पक्षाने ही निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे राहुल नार्वेकर यांच्या निवडीची अधिकृत घोषणा आज (सोमवार) केली जाणार आहे.
राहुल नार्वेकर यांनी विधानसभा सचिवालयात उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार ,भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते. विधानसभा अध्यक्षपदासाठी रविवारी दुपारी बारापर्यंत अर्ज भरण्याचा वेळ होता. या कालावधीत महायुतीचे उमेदवार राहुल नार्वेकर यांचा अर्ज दाखल झाला.
महविकस आघाडीने अध्यक्षपदासाठी उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला . त्यामुळे राहुल नार्वेकर हेच पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदी विराजमान होणार आहेत. आज त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब केला जाईल.