मी 58हजार मताधिक्याने विजयी झालो यात एकही मुस्लिम मत नाही; भाजपा आमदाराचे वक्तव्य

मुंबई: कणकवलीचे नवनिर्वाचित आमदार नितेश राणे यांनी आमदारकीची शपथ घेण्याआधी मीडियाशी संवाद साधला. नितेश राणे हे2014, 2019 आणि 2024 असे तीन वेळा विधानसभेवर निवडून आले आहेत. नितेश राणेंनी आपल्या विजयात एक ही मुस्लिम मत नाही असा दावा केला आहे.

 

 

नितेश राणे म्हणाले, माझी तिसऱ्यांदा हॅट्रिक झाली. कणकवली देवगडच्या जनतेने मला निवडून आणले आहे माझ्या मतदारसंघातील हिंदू समाजाने मला मोठ्या प्रमाणात मतदान केलं आहे. हिंदुत्व आणि विकास या दोन प्रमुख मुद्द्यावर मी निवडणूक लढवली. मी कणकवली देवगड मधून 58,000 मताधिक्याने विजयी झालो यात एकही मुस्लिम मत नाही हिंदुत्ववादी विचारसरणीच्या मतदारसंघाचा आमदार म्हणून निवडून आलोय . सत्ताधारी पक्षाचा आमदार म्हणून विकासाची प्रक्रिया कायम ठेवणार आहे असेही ते म्हणाले.

नितेश राणे हे सतत हिंदुत्वाबद्दल बोलत असतात. आक्रमक हिंदुत्वाचा प्रचार करतात. आज मीडियाशी बोलताना स्वत:च्या विजयाबद्दल सांगताना त्यांनी हाच मुद्दा मांडला.

🤙 9921334545