बांधकाम कामगारांची कामगार कार्यालयासमोर निदर्शने

कोल्हापूर : बांधकाम कामगारांची नोंदणी, नूतनीकरण व लाभाच्या अर्जाबाबतची ऑनलाईन वेबसाईट व पोर्टल कामगारांना व्यक्तिगत अर्ज दाखल करण्यासाठी बंद ठेवण्यात आली आहे ती सुरु करा, जाहीर केलेला बोनस (सानुग्रह अनुदान) द्या, या मागणीसाठी संयुक्त बांधकाम कामगार कृती समितीच्यावतीने सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोरजोरदार निदर्शने करण्यात आली.

 

 

केवळ तालुकास्तरावर सुरू केलेल्या ठेकेदाराच्या सुविधा केंद्रावरूनच बांधकाम कामगारांचे सर्व प्रकारचे अर्ज सादर करण्याची अट आहे. रोज पन्नास कामगारांची अर्ज दाखल करण्याची अट घालण्यात आली आहे. त्यामुळे कामगारांना दिवसभर ताटकळत थांबावे लागते. यामुळे हजारो कामगारांची कामे अडकून पडलेली आहेत. कामगारांच्या विविध योजना पेक्षा ठेकेदारावर हजारो कोटी खर्च केले आहेत.

हे केवळ मंडळाच्या पैशाची उधळपट्टी सुरु आहे. ती थांबवावी व पुर्वीप्रमाणे ऑनलाईन पोर्टल व वेबसाईट सुरू करावी,
जाहीर केलेला दिवाळी बोनस (सानुग्रह अनुदान) कामगारांच्या खात्यावर सोडावे आदी मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले. सदर निवेदन वरिष्ठ पातळीवर पाठवून
सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न करु, असे अश्वासन सहाय्यक कामगार आयुक्त जानकी भोईटे यांनी शिष्टमंडळास दिले.

यावेळी कॉ. आनंदा गुरव, गणेश तडाखे, संजय खानविलकर, अशोक सुतार, जयप्रकाश कांबळे, माहेश लोहार, आकाश बनसोडे, अभिजीत आवळे, सचिन भोरे, राहुल दवडते, राहुल शिंदे, सतिश वायदंडे, परसराम कत्ती, सचिन खाडे, भीमराव जामकर, तोफिक नायकवडी, दीपक रेपाळ, अण्णा हालगेकर, अजय रेडे, अनिल जाधव, विकी माने, भैय्यासाहेब धनवडे, गणेश वायदंडे, राहूल चिनके आदी उपस्थित होते.

🤙 9921334545