बाबासाहेबांचे संविधान कोणीही बदलू शकत नाही ; विरोधकांकडून फक्त दिशाभूल करण्याचे काम सुरु : चंद्रदीप नरके

कोल्हापूर : चंद्रदीप नरके यांच्या उपस्थितीत डाॅ बाबासाहेब आंबेडकर विचारमंच संवाद मेळावा पार पडला. बाबासाहेबांवर बाबासाहेबांच्या विचारांवर प्रेम करणारा मोठा जनसमुदाय या मेळाव्याला उपस्थित होता. बाबासाहेबांचे संविधान कोणीही बदलू शकत नाही, विरोधकांकडून फक्त दिशाभूल करण्याचे काम सुरु असल्याचे नरके यांनी सांगितले.

 

 

 

यावेळी कुंभी कासारी सहकारी बँक संचालक दत्तात्रय कांबळे , कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना संचालक के.डी.कांबळे , खरेदी विक्री संघ संचालक परसु कांबळे , हंबीरराव पाटील, दता मेडसिंगे, मधुकर जांभळे, प्रा.शहाजी कांबळे, बाळासाहेब वाशीकर, अमित कांबळे, लोकजनशक्ती पार्टीचे पदाधिकारी अर्जुन कांबळे (पाडळीकर), जिल्हा कार्याध्यक्ष – संदीप कांबळे, जिल्हा संघटक – भगवान कांबळे, यांच्यासह नागरिक प्रचंड संख्येने उपस्थित होते.