कोल्हापूर: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रातील गड किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व आणि शिवछत्रपतींच्या गौरवशाली इतिहासाचे दर्शन घडवणाऱ्या प्रतिकृतींची निर्मिती जोरदार सुरू आहे. याच संदर्भात, तारदाळ येथील गौरी शंकर नगर, कट्टा गँग मित्र मंडळाने श्री कुलाबा किल्ल्याची आकर्षक प्रतिकृती साकारली आहे.
या अनोख्या उपक्रमाला डॉ. राहुल आवाडे यांनी भेट देऊन किल्ल्याच्या संपूर्ण स्थापत्याचा आढावा घेतला . या प्रतिकृतीत श्री कुलाबा किल्ल्यावरील प्रमुख वास्तूंसोबतच, गडाच्या बारकाईची देखील प्रभावी झलक दाखवण्यात आली आहे. या कार्याने इतिहासाची जपणूक आणि सांस्कृतिक वारसा जिवंत ठेवण्याचा एक अनोखा प्रयत्न केला आहे.
या उपक्रमामुळे स्थानिक समाजात किल्ल्यांबद्दलची जागरूकता वाढेल आणि भविष्यातील पिढ्यांना शिवछत्रपतींच्या गड किल्ल्यांचे महत्त्व समजून घेण्यास मदत होईल.
यावेळी प्रमुख पदाधिकारी, मंडळाचे कार्यकर्ते, नागरिक व महिला उपस्थित होते.