राजू शेट्टी, उल्हास पाटील, सुजित मिणचेकर यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट

कुंभोज : आंतरवाली सराटी येथे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा योध्दा मनोज जरांगे -पाटील यांची भेट माजी खासदार राजू शेट्टी यांनी घेतली. यावेळी शिरोळ विधानसभेचे स्वाभिमानीचे उमेदवार,माजी आमदार उल्हासदादा पाटील, हातकंणगले विधानसभा मतदारसंघाचे स्वाभिमानीचे उमेदवार, माजी आमदार सुजित मिणचेकर यांच्यासह स्वाभिमानीचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

 

परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून स्वाभिमानी पक्षाच्यावतीने राज्यातील २३ विधानसभा मतदारसंघात उमेदवार ऊभे केले आहेत. राज्यातील बहुसंख्य शेतकरी हा मराठा समाजाचा आहे. सरकारच्या धोरणामुळे शेती तोट्यात गेलेली आहे. अल्पभुधारक असणारा शेतकरी आर्थिकदृष्ट्या पिचलेला आहे यामुळे सध्या मराठा समाजाला आरक्षण देणे गरजेचे आहे. यामुळे शेतकरी चळवळीच्या माध्यमातून राज्यातील विविध मतदारसंघातील उमेदवारांना सहकार्य करावे याकरिता मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली.

🤙 9921334545