कोरोचीतील मंडळाने साकारली कंधार किल्ल्याची प्रतिकृती: राहूल आवडेंनी भेट देऊन घेतला आढावा

कोल्हापूर:दिवाळीच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रातील गड किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व आणि शिवछत्रपतींच्या गौरवशाली इतिहासाचे दर्शन घडवणाऱ्या प्रतीकृतींची निर्मिती जोरदार सुरू आहे. याच संदर्भात, कोरोची येथील ३७० मित्र मंडळाने श्री कंधार किल्ल्याची आकर्षक प्रतीकृती साकारली आहे.

 

 

या अनोख्या उपक्रमाला महायुतीचे अधिकृत उमेदवार राहुल प्रकाश आवाडे यांनी भेट देऊन किल्ल्याच्या संपूर्ण स्थापत्याचा आढावा घेतला गेला. या प्रतीकृतीत श्री कंधार किल्ल्यावरील प्रमुख वास्तूंसोबतच, गडाच्या बारकाईची देखील प्रभावी झलक दाखवण्यात आली आहे. या कार्याने इतिहासाची जपणूक आणि सांस्कृतिक वारसा जिवंत ठेवण्याचा एक अनोखा प्रयत्न केला आहे.

या उपक्रमामुळे स्थानिक समाजात किल्ल्यांबद्दलची जागरूकता वाढेल आणि भविष्यातील पिढ्यांना शिवछत्रपतींच्या गड किल्ल्यांचे महत्त्व समजून घेण्यास मदत होईल.

यावेळी प्रमुख पदाधिकारी, मंडळाचे कार्यकर्ते, नागरिक व महिला उपस्थित होते.