कोल्हापूर : ‘चाय पे चर्चा’ या उपक्रमाच्या माध्यमातून डॉ. राहुल आवाडे प्रत्येकाच्या समस्या, अपेक्षा आणि भावना जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. . या चर्चेतून नव्या दृष्टिकोनांसह, समस्यांच्या सोडवणुकीसाठी प्रभावी उपाय शोधण्याची प्रेरणा मिळाली असल्याची भावना राहुल आवाडे यांनी व्यक्त केली. नागरिकांशी थेट संवाद साधताना आम्हाला केवळ शिकण्याची संधी मिळत नाही, तर समाजाच्या गरजा आणि अपेक्षांची अधिक स्पष्ट समजही निर्माण झाली, ज्यामुळे मनाला समाधान आणि उद्दिष्टे साध्य करण्याची नवी ऊर्जा मिळाते.असे राहुल आवाडे म्हणाले.
यावेळी राहुल आवाडे यांनी आजपर्यंत केलेल्या कामांच्या बद्दल नागरिकांचे मत व प्रतिक्रिया जाणून घेतल्या. तसेच त्यांच्या सूचनांमुळे पुढील कामांना दिशा मिळाली. आपल्या विश्वासाने आम्हाला नवी ऊर्जा मिळते, आणि आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही सातत्याने कार्यरत राहू, याचा आम्हाला दृढ विश्वास आहे असे नागरिकांना सांगितले.
यावेळी तानाजी पोवार, रमेश कबाडे, उदय बुगड, महेश सातपुते, धोंडीराम जावळे, जयेश बुगड, मोहन मालवणकर, राजेश रजपूत, प्रमोद पोवार नागेश पाटील, प्रशांत नवनाळे, संतोष कांदेकर, अनिल महालदार यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी व सुतार मळा परिसरातील ज्येष्ठ नागरिक व युवक उपस्थित होते.