रोटरी क्लब ऑफ मिडटाऊन कोल्हापूर आणि भागीरथी महिला संस्थेच्या वतीने दिव्यांगाना ट्रायसिकल आणि व्हीलचेअरचे वाटप

कोल्हापूर:रोटरी क्लब ऑफ मिडटाऊन कोल्हापूर आणि भागीरथी महिला संस्थेच्या वतीने दिव्यांगाना ट्रायसिकल आणि व्हीलचेअरचे वाटप करण्यात आले. यावेळी भीमा साखर कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडीक व मंजिरी महाडिक प्रमुख उपस्थित होते.

 

 

भागीरथी महिला संस्थेच्या माध्यमातून व अरुंधती महाडिक यांच्या संकल्पनेतून गेली वीस वर्षे सातत्याने समाज कल्याणपर कार्य केलं जात आहे. सामाजिक, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रातील गुणवंतांना सहकार्य असेल किंवा गरजूंना मदत असेल भागीरीथी महिला, संस्था यासाठी नेहमी प्रयत्नशील राहिली आहे.याच प्रेरणेतून दिव्यांगाना ट्रायसिकल आणि व्हीलचेअरचे वाटप करण्यात आले. या ट्रायसिकल दिव्यांगाना व्यवसायासाठी नक्कीच उपयुक्त ठरतील, असे मत यावेळी भीमा साखर कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक यांनी व्यक्त केले. महाडिक परिवार नेहमीच अशा सामाजिक उपक्रमासाठी दिव्यांगाच्या पाठीशी राहील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

🤙 8080365706