खासदार धनंजय महाडिक यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट

कोल्हापूर:भाजपा खासदार धनंजय महाडिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत. कोल्हापूर उत्तर मधून धनंजय महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक इच्छुक आहेत. तर शिराळा मतदार संघातून सम्राट महाडीक यांच्यासाठी धनंजय महाडिक यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे या दोन्ही उमेदवारीसाठी मुख्यमंत्र्यांशी, महाडिक यांच्या भेटीगाठी सुरू आहेत का? अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.

 

 

2022 च्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपचे सत्यजित कदम यांना 80 हजारावर मते मिळाली होती त्यामुळे या मतदारसंघात भाजपला सुद्धा उमेदवारी मिळावी, असा प्रयत्न सुरू आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाकडून राजेश क्षीरसागर यांकणी आपली उमेदवारी निश्चित मानली आहे. त्यामुळे कोल्हापूर उत्तर आणि शिरोळ या मतदारसंघातील उमेदवारीवरून धनंजय महाडिक यांच्या भेटीगाठी सुरू असल्याचे बोलले जात आहे.