ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवणार : अमल महाडिक

कोल्हापूर: विधानसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून अमल महाडिक यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर, कोल्हापुरातील प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला.ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवणार असल्याचा पुनरुच्चार यावेळी केला.

 

विरोधक अफवा पसरवून गैरसमज निर्माण करून निवडणुकीला वेगळा रंग देण्यात पटाईत आहेत पण या निवडणुकीत जनतेला सारं काही समजून चुकले त्यामुळे महायुतीचा विजय निश्चित आहे असा विश्वास यावेळी अमल महाडिक यांनी व्यक्त केला.