नाशिक : महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचा संकल्प मेळावा नाशिक येथे मोठ्या उत्साहात पार पडला. काल केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने महाराष्ट्रात आचारसंहिता लागू केली, या पार्श्वभूमीवर नाशिक मध्ये झालेले स्वागत येणाऱ्या काळातील दिशा अधोरेखित करणारे आहे.
पाथर्डी फाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन करून रॅली काढण्यात आली.रावसाहेब थोरात सभागृहामध्ये मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला महिलांची विलक्षण उपस्थिती होती.
आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये ‘परिवर्तन महाशक्ती’ कडून महाराष्ट्राचे राजकारण स्वच्छ करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केले जाणार आहेत, आम्ही प्रामाणिकपणे जनतेचे प्रश्न जाणून असणाऱ्या उमेदवारांना संधी देणार असल्याचे मत यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केले.
यावेळी मेळाव्यासाठी सरचिटणीस धनंजय जाधव, उपाध्यक्ष विनोद साबळे, उत्तर महाराष्ट्र प्रमुख केशव गोसावी, ज्ञानेश्वर थोरात, डॉ. रुपेश नाठे, प्रा. उमेश शिंदे, नितीन पाटील, रोशन खैरे, रेखाताई जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.