कुंभोज ( विनोद शिंगे )
नरंदे गावच्या सर्वांगीण विकासासाठी आतापर्यंत साडेतीन कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी वेगवेगळ्या माध्यमातून लाभला असून त्यासाठी माजी आमदार व भाजपचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांचे सहकार्य लाभले. परिणामी नरंदे गावच्या सर्वांगीण विकासासाठी आपण लागेल ते प्रयत्न करणार असून निवडणुकीनंतर कोठ्यावधी रुपयाच्या विकास कामांचा शुभारंभ केला जाणार आहे असे जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले यांनी सांगितले.
ते नरंदे तालुका हातकणंगले येथे वेगवेगळ्या फंडातून नियोजित विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार सुरेश हाळवणकर हे उपस्थित होते. यावेळी माजी आमदार सुरेश हाळवणकर म्हणाले की, बापूजी पॅनलच्या बुलेट ट्रेनच्या गतीने विकास झाला असून बुलेट ट्रेनच्या माध्यमातून आतापर्यंत साडेतीन कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची विकासकामे जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले यांच्या माध्यमातून झाली आहेत. परिणामी त्यासाठी सक्षम असणारे माजी सरपंच अभिजीत भंडारी, रवी अनुसे व त्यांच्या सहकाऱ्यांनी विकास कामांच्या निधीसाठी पाठपुरावा करून नरंदे गावच्या विकास साधण्याचा प्रयत्न केला आहे. व त्यांच्या पाठपुराव्यामुळेच आज नरंदे गावचा विकास झाला असल्याचे मत ही त्यांनी व्यक्त केले.
तसेच नरंदे गावाला स्वच्छ व सुंदर पाणी उपलब्ध करून देण्यासाठी येणाऱ्या काळात लवकरच सदर कामाचे उद्घाटन केले जाईल असा विश्वासही यावेळी जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले यांनी बोलताना व्यक्त केला, कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक माजी सरपंच रवींद्र अनुसे यांनी केले. यावेळी कोल्हापूर जिल्हा भाजपच्या कार्यकारणीवर निवड झाल्याबद्दल संभाजी बन्ने यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गिड्डे मुलांनी खोत मळ्याकडे जाणारा रस्ता यासाठी एक कोटी दहा लाख, भोरे मळा शरद कारखाना जवळील रस्ता काँक्रीटिकरण दोन लाख, दादू भोरे मळा काँक्रिटीकरण तीन लाख ,भंडारी गल्ली येथे काँक्रीटीकरण दहा लाख, माळभाग चर्मकार वसाहत रस्ता कॉंक्रिटीकरण नऊ लाख पन्नास हजार कामांचा शुभारंभ माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार ग्रामपंचायत नरंदे व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला. यावेळी वडगाव बाजार समितीचे संचालक किरण इंगवले, आळते गावचे लोकनियुक्त सरपंच अजिंक्य इंगवले, शरद कारखान्याची संचालक अभिजीत भंडारी ,अमित भंडारी, विनोद भंडारी नामदेव पाटील, अर्जुन कांबळे, संतोष भंडारी, लक्ष्मीबाई खोत, मेगा चौगुले, पतंगराव पाटील, अर्चना गिड्डे, शोभा शेटे मंगल एडवान, सिकंदर मुलांनी, रेखा कदम, भोपाल देसाई रंजना पाटील ,आनंदराव भंडारी उपस्थित होते. आभार प्रदर्शन ग्रामपंचायत सदस्य नितीन कदम व संभाजी बनणे यांनी केले. सूत्रसंचालन विनोद शिंगे यांनी केले.