आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या फंडातून कुंभोज गणेश मंदिरासाठी दहा लाखाचा निधी मंजूर

 

कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे)

कुंभोज (ता. हातकणंगले )येथील नव्याने बांधकाम सुरू असलेल्या गणेश मंदिराच्या जागेसाठी सुशोभीकरण व सभागृह बांधकामासाठी माजी आरोग्य राज्यमंत्री व शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या जनसुविधा फंडातून दहा लाख रुपये मंजूर झाल्याचे पत्र आज रितेश हिगंलजे यांच्या माध्यमातून गणेश मंदिर कमिटी यांच्याकडे सुपुद करण्यात आले.

 

 

यावेळी जवाहर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले महाविकास आघाडीचे गटनेते किरण माळी, तात्यासाहेब हराळे, अजित कळत्रे, रावसाहेब तोरसकर ,छत्रपती राजाराम कारखान्याचे संचालक अमित साजनकर ,योगेश साजनकर रविराज जाधव, बबलू कुंभार ,प्रकाश हराळे,अजीत साजणकर,बारकु सपकाळ आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार राजेंद्र पाटील एडावकर यांनी कुंभोज गणेश मंदिरासाठी संधी दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदनाचा ठराव महाविकास आघाडीचे गटनेते किरण माळी यांनी केला.