जाग्यावर निर्णय घेणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखा मुख्यमंत्री महाराष्ट्राला एक वरदानच -डी सी पाटील

 

कुंभोज  (विनोद शिंगे)

कुंभोज तालुका हातकलंगले येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डी सी पाटील हे उपस्थित होते. यावेळी बोलताना केवळ प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत चांगली असून उपयोग नाही तर त्यामध्ये काम करणारा कर्मचारी वर्ग हा सर्व गुण संपन्न व येणाऱ्या रुग्णांशी प्रेमाने वागणारा असणे गरजेचे आहे .परिणामी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडवणीस यांनी महाराष्ट्रात राबवलेल्या वेगवेगळ्या योजना सर्वसामान्य नागरिकाला दिलासा देत असून त्यांनी लाभोवलेली बहिण लाडकी योजना, मुलींना मोफत शिक्षण ,मोफत धान्य ,अशा वेगवेगळ्या योजना राबवून शिंदे सरकारने सर्वसामान्य मतदाराच्या मनावर अधिराज्य निर्माण केले आहे .परिणामी गटातटाचे राजकारण न करता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखा मुख्यमंत्री महाराष्ट्राला पुन्हा पुन्हा मिळावा व महाराष्ट्राचा त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांचा विकास व्हावा असे मत माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डी सी पाटील यांनी बोलताना व्यक्त केले.

परिणामी महाराष्ट्राला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यासारखा ठाम निर्णय घेणारा व निर्णय घेताना कोणतीही परवा न करणारा मुख्यमंत्री ही काळाची गरज असून यापूर्वी एखादा निर्णय घेणेसाठी दिल्ली दरबारचे उंबरे झिजवावे लागत होते .परिणामी आता महाराष्ट्राला एक कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री मिळाल्याने कोणताही निर्णय तात्काळ घेऊन तो सर्व सामान्य जनते पर्यंत पोहोचवण्यात ते यशस्वी झाले आहेत. परिणामी येणाऱ्या काळात पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन व्हावं अशी सर्व सामान्य जनतेची इच्छा आहे असेही मत यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डी सी पाटील यांनी बोलताना व्यक्त केले.