कोल्हापूर : “मिशन रोजगार” अंतर्गत पीएम विश्वकर्मा योजनेमधून बार्बर गोल्डस्मिथ व मेसन प्रशिक्षण घेतलेल्या 200 प्रशिक्षणार्थींना पूजा ऋतुराज पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.
डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग साळोखे नगर कॅम्पस येथे झालेल्या या कार्यक्रमाला कॅम्पस चे डायरेक्टर डॉ. अभिजीत माने, विश्वकर्मा योजनेच्या जिल्हा समन्वयक शितल गणेशाचार्य, मिशन रोजगारचे राजन डांगरे, प्रियांका मोहिते, दिपाली देसाई, यास्मिन मोमिन, समिना जमादार, वैष्णवी कोरडे आदींची उपस्थिती होती.