कोल्हापूर (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील टोप येथील पत्रकार नंदकुमार साळोखे यांना वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कार महाराष्ट्राचे राज्यपाल डॉ. सी. पी. राधाकृष्णन,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कृषी मंत्री .धनंजय मुंडे यांच्या शुभ हस्ते मुबंई येथे प्रदान करण्यात आला.
साळोखे पंचवीस वर्षे पत्रकारितेत असून ग्रामीण भागातील विविध विषयावर लेखन करत असतात. आधुनिक शेती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पादन खर्च उत्पन्नामध्ये वाढ करण्यासाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणीवर मात करून त्यांनी दैनिक तरुण भारत च्या माध्यमातून विशिष्ट प्रभावी शेती विषयक लेखन करून पारदर्शकपणे शेतकऱ्यांच्या यशोगाथा, तसेच कृषी विभागाकडील चर्चासत्रे शेतकरी मेळावे, बीज प्रक्रिया मोहीम, प्रदर्शने, अशा महत्त्वपूर्ण विषयावर लेखन करून पत्रकारितेत नवीन आदर्श निर्माण केला आहे. कृषी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय पत्रकारिता केलेबद्दल त्यांना जिल्हा परिषदेचा प्र. के. अत्रे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार,कोल्हापूर डिस्ट्रिक रिपोर्टर असोसिएशनचा पुरस्कार,कृषी विभागाच्या जिल्हा कृषि महोत्सवात विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
कार्यक्रमास आमदार विक्रम काळे,कृषी सचिव जयश्री भोज, आयुक्त रवींद्र बिनवडे,संचालक विकास पाटील, कृषी अधिकारी अरुण भिंगारदिवे, महादेव जाधव,श्रीमती सावित्री साळोखे, आनंदराव साळोखे आदी उपस्थित होते