राहुल गांधींनी जिंकली मने, उचगावात टेम्पो चालकाच्या घरी दिली भेट

कोल्हापूर – लोकसभेचे विरोधी पक्ष नेते खा. राहुल गांधी आज सकाळी कोल्हापूरात दाखल झालेयत. विमानतळावरून ते थेट उंचगाव मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात दाखल झाले आणि ते टेंपो चालक अजित तुकाराम सनदे यांच्या घरी पोहचले.

अर्ध्या तासांहून अधिक काळ त्यांच्या घरी थांबलेले खा. राहुल गांधी यांनी सर्वांनाच एक सुखद धक्का दिलाय. खा. राहुल गांधी हे नेहमीच सामान्य माणसांशी नातं जपण्याचा प्रयत्न करतात आपल्या कोल्हापूर दौऱ्यातही त्यांनी आपली भारत जोडण्याची ही खासियत जपलीय.

 

 

🤙 9921334545