आमदार राजूबाबा आवळे यांच्या उपस्थितीत पेठ वडगाव येथे श्री संत बाळूमामा मंदिराची दुरुस्ती आणि हॉलचा उद्घाटन सोहळा संपन्न

कोल्हापूर : पेठ वडगाव येथे 18 लाख रुपयांच्या निधीतून श्री संत बाळूमामा मंदिराची दुरुस्ती आणि हॉलचा उद्घाटन सोहळा आमदार राजूबाबा आवळे यांच्या उपस्थितीत पार पडला.

मानवतेची शिकवण देणारे श्री संत बाळूमामा आपल्या सगळ्यांचे श्रद्धास्थान या ठिकाणी हजारो फक्त दर्शनासाठी येत असतात त्यांना बसण्यासाठी भव्य असा हॉल असावा अशी मागणी होती तसेच मंदिराच्या दुरुस्तीचा प्रश्नही होता आज त्याची वचनपूर्ती झाली आहे.

उद्घाटन प्रसंगी राजूबाबा आवळे हे उपस्थितीत राहून श्री संत बाळूमामा ची आरती करून मनोभावे दर्शन घेतले तसेच मतदारसंघाच्या सुख-समृद्धीसाठी बाळूमामा कडे प्रार्थना केली. गावकऱ्यांनी स्वागत करून सत्कार केला. यावेळी नागरिक, भाविक भक्त, तरुण मित्र आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.