कसबा तारळेतील उपजिल्हा रुग्णालयाच्या बांधकामाचा आ. प्रकाश आबीटकर यांच्या हस्ते प्रारंभ

कोल्हापूर: राधानगरी व गगनबावडा तालुक्यातील नागरीकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्व पुर्ण असणाऱ्या उपजिल्हा रुग्णालय, कसबा तारळे, ता.राधानगरी बांधणेसाठी 23 कोटी 38 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून सदर कामाचा शुभारंभ प्रकाश आबिटकर तसेच प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

 

अशक्य ते शक्य करतील स्वामी या उक्ती प्रमाणे अशक्य ते शक्य करतील तारळेकर असे म्हणावे लागेल असा हा आजचा कार्यक्रम आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र ते उपजिल्हा रुग्णालय अशी मोठी झेप घेण्याचे काम आपण सर्वांनी केले आहे. याकरीता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तत्कालीन आरोग्यमंत्री असताना या प्रकल्पास तत्वत: मान्यता दिली होती. त्यानंतर खऱ्या अर्थाने या उपजिल्हा रुग्णालयाच्या कामाची सुरवात झाली त्यामुळे या कामास मुर्त स्वरुप आले आणि या उपजिल्हा रुग्णालयास खासबाब म्हणून देखील मंजूरी देण्याचे काम मुख्यमंत्री यांनी केले असून त्यांचे विशेष आभार मानावे लागेल.

पुढील काळात मुख्यमंत्री आपल्या मतदार संघात येत असून धामणी प्रकल्पाची घळ भरणी करणार असून सरवडे येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कार्यक्रमाचे आयोजन केले आहे त्याकरीता सर्व मता-भगिनींनी उपस्थित रहावे. असे आवाहन प्रकाश आबिटकर यांनी केले.

यावेळी सह्याद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब नवणे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संभाजीराव आरउे, दत्तात्रय हरी पाटील, अशोकराव फराकटे, दत्तात्रय धोंडी पाटील, दत्तात्रय हणमंत पाटील, संजय पाटील, कसबा तारळे सरपंच विमल पाटील, रविंद्र पाटील, शौकत बक्षू, डॉ.सुभाष जाधव, सुभाष चौगले , जेष्ठनेते शामराव भावके, अशोक वारके, तानाजीराव चौगले, विश्वनाथ पाटील, विजयराव बलुगडे, विजय पाटील-कौलवकर, दिपक शेट्टी, संतोष पाटील, सुभाष पाटील-मालवेकर, संग्राम पाटील-गुडाळकर, राजेंद्र वाडेकर, बाळासो बेलेकर, तानाजी पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.शेटे, विश्वास राऊत, तात्यासो पाटील, विजय पाटील, अशोक पाटील , उपसरपंच संभाजी पाटील, बबन पवार सर, सुभाष पाटील, अंकूश कवडे सर, दिलीप पाटील , आणाजे सरपंच शिवप्रसाद पाटील, कुंभारवाडी सरपंच रणजित पाटील, सुरेश पाटील, कांबळवाडी सरपंच अनिता कुसाळे, अमर पाटील, नितीन पोतदार, शांताराम बुगडे, अभिजित गुळवणी, कुशल कुकडे, सुरेश पाटील, सचिन पाटील, अरुण पाटील, अशोकराव सरनोबत, रमेश साबळे, हसन नाईक, व्ही.टी.जाधव सर यांच्यासह प्रमुख मान्यवर व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.