महाराष्ट्रात पुन्हा भाजप सरकार सत्तेत येणार -अरुण इंगवले

कुंभोज (विनोद शिंगे)

कुंभोज (ता. हातकलंगले) येथे भाजप कुंभोज शहर कार्यकारिणच्या पदाधिकाऱ्यांचे निवड प्रक्रिया संपन्न झाली नूतन पदाधिकाऱ्यांना हातकणंगले तालुका भाजपचे अध्यक्ष खोची गावचे माजी उपसरपंच अमरसिंह पाटील दलित मित्र अशोकरावजी माने ,कोल्हापूर जिल्हा परिषदेचे सदस्य भाजप नेते अरुणराव इंगवले,सुदाम इंगवले आदी मान्यवरांच्या हस्ते निवडीचे पत्र वाटप करण्यात आले.

यावेळी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष अरुण इगंवले म्हणाले की, संपूर्ण देशात सध्या मोदी सरकारची लाट असून महाराष्ट्रात पुन्हा मोदी सरकार येणाऱ्या काळात सत्तेत येणार आहे. परिणामी मोदी सरकारच्या काळात अनेक विकास कामे झाले असून देशाच्या सर्वांगीण विकासासाठी शिंदे फडवणीस सरकार पुन्हा सत्तेत येणे गरजेचे आहे. त्यासाठी भाजपला मतदान करून विकासाची गंगा आपल्या भागात आणा. यावेळी बोलताना दलित मित्र अशोक माने यांनी आपण आगामी हातकणंगले विधानसभा निवडणूक भाजपच्या माध्यमातून लढवणार असून त्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे.

शिंदे फडवणीस सरकारच्या माध्यमातून बहीण लाडकी योजनेचा हप्ताही सर्वांच्या खात्यावर जमा झाला असून इथून पुढे हे कार्य चालू राहण्यासाठी शिंदे फडणवीस सरकारला बहुमताने निवडून देण्याच्या आव्हानही यावेळी केले. कार्यक्रमाचे स्वागत प्रस्ताविक संभाजी चव्हाण व आभार छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची संचालक अमित साजनकर यांनी मांनले, यावेळी नूतन पदाधिकारी निवडी खालील प्रमाणे.संभाजी चव्हाण शहर अध्यक्ष ,कुमार कोळी ,राहुल माळी ,प्रविण भानुसे,किरण खोत ,दिपक माने ,राहुल कत्ते,संभाजी माळी संजय भट्टे,अमोल मिसाळ ,प्रक्तिक कोळी,अँड अमित साजणकर,अनिल शिंदे,विश्वजीत माने,संजय कोळी, चौगुले, अशोक वाईकर, राहुल उर्फ बंटी कोतले,अनिल भेंडवडे यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आली.