कोल्हापूर : चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्वाखाली पोर्ले तर्फ बोरगाव येथील काँग्रेस व जनसुराज्य पक्षांमधून भराडी देवी विकास सेवा संस्था पोर्ले तर्फ बोरगावचे माजी चेअरमन दत्तात्रय धोंडीराम काटकर व पंकज राजाराम काटकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यांना शिवसेनेचा मफलर देऊन सर्वांचे स्वागत केले.
यामध्ये बाबासाहेब पांडुरंग जाधव, राम दत्तात्रय काटकर, पुष्कर बाजीराव काटकर, धोंडीराम गोविंद डोब, एकनाथ बाळू काटकर, नाथाजी लक्ष्मण घाडे, गणपती कोंडी काटकर, दिनकर लक्ष्मण काटकर, बाजीराव दाजी काटकर, संदीप दिनकर काटकर (दत्त दूध संस्था पोर्ले चे माजी चेअरमन) यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
यावेळी सखाराम रामचंद्र म्हेतर (संचालक दत्त दूध संस्था पोर्ले तर्फ बोरगाव), कुंभी कासारी साखर कारखान्याचे संचालक पी डी पाटील, कुंभी कासारी साखर कारखान्याचे संचालक सुरेश काटकर, सिद्धिविनायक दूध संस्था पोर्ले तर्फ बोरगावचे संस्थापक अमित काटकर, कुंभी कासारी बँकेच्या संचालक प्रकाश काटकर, दत्त दूध संस्था पो तर्फ बोरगावचे चेअरमन मोहन काटकर, पोर्ले तर्फ बोरगावचे सरपंच बाजीराव कांबळे, उपसरपंच भगवान काटकर, भराडी देवी विकास सेवा संस्था पोर्ले तर्फ बोरगावचे संचालक सचिन म्हेतर प्रमुख उपस्थित होते.